मुंबई : सिमेंट आणि सळईच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या स्वप्नातील घर बांधण्याची हीच योग्य संधी आहे. दोन महिन्यांत सिमेंटच्या किंमतीत वाढ झाली होती. मात्र, या चालू नोव्हेंबरमध्ये त्याची किंमत कमी झाली आहे. सळईच्या किंमती जवळपास १००० रुपयांनी कमी झाल्या आहेत.
आता स्वप्नातील घर बांधण्याची चांगली संधी आहे. कारण नोव्हेंबर महिन्यात सळई आणि सिमेंटच्याकिंमतीत घसरण झाली आहे. या दोन्ही गोष्टी घर बांधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शिवाय यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. आता त्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पूर्वीपेक्षा कमी पैसे खर्च करुन तुमच्या स्वप्नातील घर बांधू शकता.
सिमेंट आणि सळईचे का पडले?
नोव्हेंबर महिन्यात दिवाळी, दसरा यांसारखे सण आले होते. अनेक राज्यांतील निवडणुकांमुळे घर बांधण्याची योजना रखडल्या होत्या. त्यामुळं सिमेंट आणि सळईचे उत्पादन कमी केले होते. तसेच उत्पादनाच्या मागणीत देखील घट झाल्याने सिमेंट आणि सळईच्याकिंमतीत घसरण झाली आहे. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सिमेंटच्या दरात सुमारे २० टक्के वाढ दिसून आली होती.
आता सिमेंटचा भाव किती?
देशातील सिमेंटच्या किंमतीबद्दल (सिमेंट प्राइस अपडेट) बोवायचे झाले तर ५० किलोच्या पिशवीचा सरासरी दर ३८२ रुपये आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत हीकिंमत अजूनही ५ टक्क्यांनी जास्त आहे. डिसेंबर महिन्यात त्याची किंमत आणखी वाढू शकते. मात्र, सणासुदीच्या काळात दिल्ली-एनसीआरमध्ये बांधकाम कमी झाली आहेत. तर बिहार आणि झारखंडमध्ये घरे बांधण्याचा खर्च वाढला आहे. तर पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये घरबांधणी उत्पादनांमध्ये घसरण झाली आहे.