32.5 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज केला दाखल

पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज केला दाखल

वाराणसी : पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसीतून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंतप्रधान तिस-यांदा काशीमधून निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत अमित शहा, राजनाथ सिंह, चिराग पासवान, रामदास आठवले, एकनाथ शिंदे आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित होते. या जागेसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर पंतप्रधानांनी कालभैरवाचे दर्शन घेतले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यानंतर वाराणसी जिल्हा निवडणूक अधिकारी/जिल्हा दंडाधिकारी राजलिंगम यांच्यासमोर उमेदवारी अर्ज भरला. यंदा पंतप्रधानांनी तिस-यांदा या ठिकाणावरून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

वाराणसीतून तिस-यांदा उमेदवारी दाखल करताना पंतप्रधानांच्या चेह-यावर उत्साह दिसत होता. दरम्यान, पंतप्रधानांच्या नामांकनात सहभागी होण्यासाठी काशीमध्ये दिग्गजांचा मेळावा भरला आहे. विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार, आमदार या सर्वांनी नामांकनात सहभाग घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR