नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदींनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले. तसेच मंदिरात पूजाही आणि आरती केली. मोदी मंदिरात पोहोचताच मंदिरातील पुजाऱ्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. मोदींकडून रामकुंड येथे जलपूजन आणि गोदावरीची आरतीही करण्यात आली. यावेळी मंदिरात येवल्याच्या पैठणीचा शेला देत मोदींचे स्वागत करण्यात आले. यानंतर तपोवनमध्ये जाहीर सभा होणार आहे.