सरकारी डॉक्टरांकडून खासगी प्रॅक्टिस गंभीर बाब

नवी दिल्ली : सरकारी दवाखान्यात कार्यरत असणा-या डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करण्याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. उच्च न्यायालय एका व्यापक सार्वजनिक मुद्यावर विचार करत होते. हे एक अतिशय चांगले कार्य आहे. कारण सरकारी डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करणे ही गंभीर बाब आहे, असे करू नये आणि तुम्हीही एक डॉक्टर आहात असेही न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सुनावले.

४ मे २०२६ रोजी उच्च न्यायालयाने डॉ. संतोष कुमार सिंग आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध दाखल झालेल्या एफआयआरची दखल घेतली होती. न्यायालयाला सांगण्यात आले की, डॉ. सिंग यांच्या पत्नी अकुरा हॉस्पिटल या खासगी नर्सिंग होमच्या संचालिका आहेत, जिथे डॉ. सिंग शस्त्रक्रिया करत असल्याचा आरोप आहे. उच्च न्यायालयाने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले होते. यापूर्वीही असेच आरोप झाले होते आणि जिल्हाधिका-यांकडून मागवण्यात आलेला अहवाल सादर करण्यात आला नव्हता, हे लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना योग्य ती कारवाई करण्याचे आणि वैद्यकीय महाविद्यालयात खासगी प्रॅक्टिस करणा-या डॉक्टरांविरुद्ध उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. तसेच रुग्णालयातील बांधकाम कामांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही मुख्य सचिवांना दिले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. संतोष कुमार सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याचिकाकर्ते डॉक्टरांचा युक्तिवाद काय?
डॉ. संतोष कुमार सिंग यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हर्षवीर प्रताप शर्मा यांनी युक्तिवाद केला की, उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेण्यात आले नव्हते. एका रिट याचिकेवर सुनावणी करताना एकल न्यायाधीशांनी त्यांच्या वैयक्तिक वादातून निर्माण झालेल्या एफआयआरचा आधार घेतला होता.

सर्व आरोप खासगी प्रॅक्टिसच्या संबंधित
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नागरत्ना यांनी स्पष्ट केले की उच्च न्यायालय एका मोठ्या सार्वजनिक समस्येवर सुनावणी करत आहे. हा हेतू अतिशय चांगला आहे. कारण शासकीय डॉक्टरांनी खाजगी प्रॅक्टिस करूच नये. तुम्ही स्वत: एक डॉक्टर आहात. ही सुनावणी वैयक्तिकरित्या डॉ. सिंग यांच्याविरुद्ध नसून शासकीय डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसच्या आरोपांशी संबंधित आहे. तुमच्याविरुद्ध वैयक्तिक असे काहीही नाही. हे खासगी प्रॅक्टिस करणा-या सर्व डॉक्टरांसाठी आहे.

अखेर याचिका घेतली मागे
न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर वकील शर्मा यांनी उच्च न्यायालयात जाण्याच्या स्वातंर्त्यासह याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. परंतु, खंडपीठाने असे कोणतेही विशेष स्वातंर्त्य देण्यास नकार दिला आणि सांगितले की, याचिकाकर्ता एकतर याचिका फेटाळण्याचा आदेश स्वीकारू शकतो किंवा ती मागे घेऊ शकतो. अखेर ही याचिका मागे घेण्यात आली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
BREAKING: नांदेडमध्ये काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
01:48
Video thumbnail
BIG BREAKING:बार्शी रोडवरील ९७ पथदिवे २० वर्षांपासून बंद; ड्रीम प्रोजेक्ट दुर्लक्षित
02:52
Video thumbnail
BIG BREAKING : मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात;आरोपीकडून ६ दुचाकी जप्त
01:01
Video thumbnail
LIVE : 'हिशोब चुकता होईल' या दानवेंच्या टीकेवर ओमराजेंची भूमिका काय?
07:08
Video thumbnail
LIVE : 'हिशोब चुकता होईल' या दानवेंच्या टीकेवर ओमराजेंची भूमिका काय?
00:00
Video thumbnail
LIVE-महाराष्ट्र विधानसभा कामकाज 2026
03:29:40
Video thumbnail
BIG BREAKING: खासदारांचा ताफा अडवण्याचा ठाकरे सेनेचा प्रयत्न; कार्यकर्त्यांचा रस्त्यावर उतरून एल्गार
03:48
Video thumbnail
BIG BREAKING : आजपासून राज्यातील शाळा सकाळच्या सत्रात;उन्हाच्या तीव्रतेमुळे शासनाचा निर्णय
01:21
Video thumbnail
जळकोट तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; नद्यांना पूर, तलाव ओसंडले तर शेतीची प्रचंड दाणादाण!
02:21
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरमध्ये उघड्या डीपी आणि जीर्ण खांबांमुळे नागरिक धास्तावले
03:10
Video thumbnail
जळकोट परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; उकाड्यापासून सुटका, अनेक गावांची बत्ती गुल
01:25
Video thumbnail
BIG BREAKING : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा १६ जागांवर विजय
02:00
Video thumbnail
Solapur|सोलापुरात कमळ फुललं; राजेंद्र राऊतांचा दणदणीत विजय!
00:53
Video thumbnail
Lakhnow|लखनऊमधील तीन मजली इमारतीला भीषण आग; १४ जणांचा मृत्यू
01:31
Video thumbnail
Latur|धाराशिव-लातूर-बीड विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय
01:24

Latest news