32.5 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeनांदेडप्रियंका गांधी रविवारी नांदेडमध्ये

प्रियंका गांधी रविवारी नांदेडमध्ये

अशोकराव चव्हाणही सोबत, तेलंगणात होणार सभा
नांदेड : प्रतिनिधी
तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचे एका विशेष विमानाने नांदेड विमानतळावर रविवारी सकाळी ११ वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने त्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह तेलंगणातील खानापूरकडे प्रयाण करणार आहेत.

तेलंगणातील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार वेडमा भोजू यांच्या प्रचारार्थ रविवारी दुपारी १२ वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेत हे दोन्ही नेते संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुपारी १.३० वाजता आसिफाबाद येथील काँग्रेसचे उमेदवार अजमेरा शाम यांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधी यांची सभा होणार असून या सभेतसुद्धा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सभेनंतर दोन्ही नेत्यांचे हेलिकॉप्टरमधून दुपारी ३.३० वाजता नांदेड येथील श्री गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर आगमन होणार आहे.

त्यानंतर लगेच प्रियंका गांधी यांचे विशेष विमानाने प्रस्थान होणार असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तेलंगणातील निजामाबाद शहर व निजामाबाद ग्रामीण येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी निजामाबादकडे मोटारीने प्रस्थान करणार आहेत. निजामाबाद येथे प्रचाराच्या बैठकांना व रोड शोला त्यांची उपस्थिती राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR