22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeराष्ट्रीयप्रियंका गांधी वाड्रा यांच्या सभांचा धडाका

प्रियंका गांधी वाड्रा यांच्या सभांचा धडाका

पुढील दोन टप्प्यांसाठी प्रचार सभांच्या कार्यक्रमांची आखणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत.आता आणखी २ टप्पे बाकी आहेत. पुढील दोन टप्प्यांत ११४ जागांवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुढील टप्पेही महत्त्वाचे आहेत. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना प्रचार सभांसाठी मागणी वाढली आहे. पुढील दोन टप्प्यांवर काँग्रेसने आता लक्ष केंद्रीत केले असून, प्रियंका गांधी यांच्या पुढील सभांचे नियोजन करण्यात येत आहे. कॉंग्रेसमधील सर्वच स्टार प्रचारक त्यासाठी कामाला लागले आहेत.

स्टार प्रचारक म्हणून पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांच्या निवडणूक सभा घेण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवारांकडून मागणी वाढली आहे. त्यांना पंजाब, हिमाचल प्रदेशातून आग्रह धरला जात आहे. पाचव्या टप्प्यात अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणा-या रायबरेली-अमेठी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे आता पुढील दोन टप्प्यांतील उमेदवारांच्या प्रचाराकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

इंडिया आघाडीकडून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर प्रियंका गांधी, सचिन पायलट यांना पक्षाच्या उमेदवारांमध्ये निवडणूक सभांना सर्वाधिक मागणी आहे. प्रियंका गांधी पाचव्या टप्प्यातील मतदानापर्यंत रायबरेलीत थांबल्या होत्या.

आज मतदान पार पडले. त्यामुळे आता त्या कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी पुन्हा सक्रीय झाल्या. पंजाबमध्ये बहुरंगी लढती होत आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये चांगली कामगिरी करण्याचे कॉंग्रेससमोर आव्हान आहे. त्याचवेळी, हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत अभिषेक सिंघवी यांचा अनपेक्षित पराभव झाला. त्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकारचे आव्हान वाढले असून लोकसभेसह सहा विधानसभा जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रियंका गांधी यांचे हिमाचल प्रदेशावरही विशेष लक्ष आहे.

११४ जागांवर मतदान बाकी
सहाव्या टप्प्यातील मतदान २६ मे रोजी आणि सातव्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार असून प्रचाराचा शेवटचा दिवस ३० मे आहे. त्यामुळे प्रचारसभांसाठी रणनिती आखली जात आहे. या दोन टप्प्यांत ११४ जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे पुढील दोन टप्पेदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने आता पुढील रणनिती आखायला सुरुवात केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR