15.2 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeराष्ट्रीयप्रियंका गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

प्रियंका गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

वायनाड पोटनिवडणुकीत उमेदवारी

वायनाड : वृत्तसंस्था
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रोड शोनंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ राहुल गांधी, आई सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते. नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रियंका गांधी यांनी मी १७ वर्षांची असताना १९८९ मध्ये पहिल्यांदा वडिलांसाठी प्रचार केला होता. तेव्हापासून या ३५ वर्षांत आई आणि भावासाठी मते मागितली. आता प्रथमच मी स्वत:साठी समर्थन मागत आहे, असे म्हटले.

वायनाड हा देशाचा एक प्रदेश आहे, जिथून २ खासदार आहेत. एक अधिकृत खासदार आणि दुसरा अनधिकृत खासदार. दोघेही वायनाडसाठी काम करतील, असे राहुल गांधी म्हणाले. प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने नव्या हरिदास यांना उमेदवारी दिली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. नंतर त्यांनी गांधी घराण्याची पारंपरिक जागा रायबरेली निवडली आणि वायनाड सोडली. येथे १३ नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR