36.5 C
Latur
Wednesday, April 16, 2025
Homeक्रीडाप्रियांशचे झंझावाती शतक; सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा भारतीय

प्रियांशचे झंझावाती शतक; सर्वात जलद शतक ठोकणारा दुसरा भारतीय

मुल्लनपुर : पंजाबच्या ताफ्यातील युवा डावखुरÞा फलंदाज प्रियांश आर्य याने चेन्नई विरुद्ध शतकी खेळीसह नवा इतिहास रचला आहे. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर पंजाबच्या संघाची सुरुवात खराब झाली. ठराविक अंतराने एका बाजूने विकेट पडत असताना युवा सलामीवीराने तो-यात फटकेबाजी करत ३९ चेंडूत शतक पूर्ण केले.

सनरायझर्स हैदराबादच्या इशान किशननंतर यंदाच्या हंगामात शतकी खेळी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय खेळाडूच्या भात्यातून आलेली ही दुसरी जलद शतकी खेळी ठरली. भारताकडून आयपीएलमध्ये सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम हा युसूफ पठाणच्या नावे आहे. त्याने ३७ चेंडूत आयपीएलमध्ये शतक झळकावले होते.

प्रियांश आर्य हा पंजाब किंग्जच्या फ्रँयायझी संघाडून सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा फलंदाजही ठरला आहे. याआधी २०१३ मध्ये डेविड मिलरने या फ्रँचायझी संघाकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध ३८ चेंडूत शतक झळकावले होते. अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत सर्वात जलद शतकी खेळी करण्याचा विक्रम आता प्रियांशच्या नावे झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR