26.4 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeसोलापूरसिल्व्हर ज्युबिली हायस्कूल, बार्शीचा पारितोषक समारंभ

सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल, बार्शीचा पारितोषक समारंभ

बार्शी : येथील के. एल. ई. सोसायटी बेळगांवी संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल, बार्शीचा वर्ष २०२३ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपत्र झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी तथा अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक देविदास घेवारे , कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विदयार्थी तथा नौरोसजी वाडिया महाविदयालयाचे प्रा. अशोक मुंढे सर, मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, उपमुख्याध्यापक अनिरुध्द चाटी, विदयार्थी प्रतिनिधी कार्तिक शिंदे, विदयार्थिनी प्रतिनिधी जागृती गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व स्वागत गीताने झाली.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख शुभांगी म्हमाणे व ज्येष्ठ शिक्षक सतीश जाधवर यांनी केला. मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे व उपमुख्याध्यापक अनिरुध्द चाटी सर यांनी पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्न भेटवस्तु देऊन सत्कार केला. प्रमुख पाहूणे घेवारे व अध्यक्ष मुंढे सर यांनी शाळेच्या प्रगतीबदद्दल खूप समाधान व्यक्त केले. आपल्या आई वडिलांनी व शाळेतील गुरुजनांनी दिलेल्या संस्कार व ज्ञानामुळेच आपण जीवनात यशस्वी झाल्याचे सांगितले. शाळेच्या पारितोषिक वितरणात दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी कायमस्वरुपी प्रत्येकी वीस हजार रुपयांची ठेव ठेवून या देणगीच्या व्याजातून वार्षिक बक्षिसांत तरतुद केली. प्रास्ताविकातून मुख्याध्यापक कोल्हेनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत सर्व यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन केले व सर्व पारितोषिक दात्यांचे आभार मानले.

चालूवर्षी प्रशालेच्या माजी शिक्षिका कै. सुमन राजूरकर- तोरगलकर यांच्या मुलामुलींनी आपल्या आईच्या स्मरणार्थ एक लाख रुपये भरीव ठेव शाळेच्या पतसंस्थकडे दिल्याबद्दल तोरगलकर परिवाराचे आभार मानले. कार्यक्रमात १८८ विदयार्थी- विदद्यार्थिनींना एक लाख तीस हजार रुपयांची रोख पारितोषिके वितरीत केली. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख शुभांगी म्हमाणे यांनी सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने पार पाडले. सुत्रसंचालन श्रीधर डिकुळे, शिल्पा फल्ले यांनी केले. बक्षीसांचे वाचन आनंद जमदाडे, प्रविणा झाडबुके, केदार गुडे, नागेश जमदाडे, विश्वास चौधरी यांनी केले. कार्यक्रमासाठी सहशिक्षक शिवराज भडुळे, गणेश ऐनापुरे, राहुल साखरे व रविंद्र मेनकुदळे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक अनिरुध्द चाटी यांनी केले. अहवाल वाचन कार्याध्यक्ष रविंद्र मठपती यांनी केले. कार्यक्रामास बहुसंख्य पालक व सर्व विदयार्थी- विदयार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वर्षा रसाळ यांनी गायलेल्या पसायदानाने झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR