परभणी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत परभणी जिल्हा स्तरीय युवा महोत्सवचे आयोजन बी. रघुनाथ सभागृहात करण्यात आले होते. या जिल्हा स्तरीय युवा महोत्सवाचे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा क्रीडाधिकारी जयकुमार ठेंबरे, शिवकांता देशमुख, प्रकाश पंडित यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या महोत्सवात समूह, वैयक्तिक लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक लोकगीत, कौशल्य विकासात कथालेखन, पोस्टर्स स्पर्धासह विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या युवा महोत्सवात जिल्ह्यातील लोककलावंतानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. सपर्धेनंतर निकाल जाहीर करण्यात आला. ज्या मध्ये प्रथम पारितोषिक समूह लोकनृत्य नागवंशी प्रतिष्ठान, वैयक्तिक लोकनृत्य प्रियंका अवचार, लोकगीताचे प्रथम पारितोषिक परभणी कोरिओग्राफर असोशियन यांनी पटकाविले तर एकपात्री अभिनयात वैष्णवी शर्मा, वैयक्तिक लोकगीत स्मृती गायकवाड, कथालेखन समीक्षा अवचार याच बरोबर युवा महोत्सवातील सहभागी विजेत्या स्पर्धकांना मानवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.