22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीकार्यक्रम हळदी कुंकवाचा जागर मतदानाचा

कार्यक्रम हळदी कुंकवाचा जागर मतदानाचा

परभणी : मकर संक्रांतीच्या पारंपारिक उत्सवाला मतदान जागृतीची जोड देऊन परभणी शहरातील जागरूक नागरिक सौ. वैशाली पोटेकर यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम हळदी कुंकवाचा – जागर मतदानाचा हा अनोखा कार्यक्रम दि. ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

राष्ट्रीय जबाबदारी आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याच्या या कार्यक्रमात सौ. वैशाली यांनी संक्रांतीची संस्कृती जतन करत मतदानाचा संदेश देणारे विविध कल्पक पोस्टर प्रदर्शित केले. ह्या प्रसंगी पारंपारिक हळदी कुंकवाच्या सजावटीसह एक प्रारूप मतदान केंद्र स्थापित करून हळदी कुंकवाच्या वाणाची प्रक्रिया निवडणूक मतदान प्रक्रियेप्रमाणे कार्यान्वित करण्यात आली. यात केंद्रातील विविध अधिकारी, मतदार यादीसारखी आमंत्रितांची यादी, क्रमांकानुसार पोलिंग चीट सारखे एक कार्ड, हळदी कुंकू लावण्यासोबत त्यांच्या बोटाला नेल पेंट लावून मतदान झाल्याची खूण करणे, मतदान कक्षासारखा वाण कक्ष, ईव्हीएम बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिटची प्रतिकृती यासारख्या अनेक बाबींचे कल्पकतेने कार्यान्वयन करण्यात आले. सर्व महिला वर्ग आकर्षित होईल अशा सुंदर सेल्फी पॉइंटची संकल्प संक्रांतीचा निर्धार मतदानाचा अशी टॅग लाईन ठेवण्यात आली.

उच्च शिक्षित समाजातील मतदानाची कमी टक्केवारी आणि प्रामुख्याने महिलांमध्ये मतदान विषयीची अनास्था पाहून मतदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे सौ. वैशाली पोटेकर म्हणाल्या. लोकशाहीत मतदान म्हणजे केवळ अधिकार नसून ती जबाबदारी आणि प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हा विचार त्यांच्या सर्व सख्यापर्यंत पोहचवण्याचा हा एक कौतुकास्पद प्रयत्न आहे. या निमित्ताने उपस्थित जवळपास ३०० महिलांनी संकल्प करून मतदान करण्याचा निर्धार केला.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR