19.8 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeराष्ट्रीयदेखभाल न केल्यास जन्मदात्यांना मालमत्ता परत

देखभाल न केल्यास जन्मदात्यांना मालमत्ता परत

सुप्रीम कोर्टाचा निर्णय, आई-वडिलांची काळजी न घेणा-यांना दिला दणका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वृद्ध आई-वडिलांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्यानंतर किंवा भेट म्हणून अशी मालमत्ता मिळविल्यानंतर आई-वडिलांना सोडून देणा-या मुलांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. आई-वडिलांकडून मालमत्ता नावावर करून घेतल्यानंतर किंवा त्यांच्याकडून भेट मिळविल्यानंतर आई-वडिलांना दूर लोटल्यास अशा मुलांना त्यांना मिळालेली मालमत्ता किंवा भेट परत करावी लागेल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमुळे वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ मुलांना कोणत्याही परिस्थितीत करावा लागेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आई-वडिलांकडून मालमत्ता नावावर करून घेऊन किंवा भेट म्हणून मिळवून नंतर त्यांना वा-यावर सोडणे मुलांना महागात पडू शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्टपणे सांगिले की, जर मुले आई-वडिलांची देखभाल करण्यात अपयशी ठरली तर आई-वडिलांनी त्यांना जी मालमत्ता भेट म्हणून दिली, ती मालमत्ता ज्येष्ठ नागरिकांचे पालन-पोषण आणि कल्याण कायद्यांतर्गत रद्द करता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने वृद्धांबाबत हा निर्णय सुनावला. त्यामुळे आता वृद्धांची काळजी घ्यावीच लागेल. ब-याचदा घरातील वृद्धांना गोड बोलून किंवा विश्वासात घेऊन त्यांच्या नावावर असलेली मालमत्ता आपल्या नावावर करून घेतात आणि ज्येष्ठांना वा-यावर सोडून देतात. अलिकडे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे अशा लोकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने खूप मोठा धडा दिला आहे. प्रॉपर्टी परत मिळविल्यास मुलांना मोठा झटका बसू शकतो. त्यामुळे आई-वडिलांची काळजी न घेणा-यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धडा दिला आहे.

आता आई-वडिलांची काळजी घ्यावीच लागेल
सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय सुनावला असून, आई-वडिलांनी मुलांच्या किंवा आपल्या वारसाच्या नावे प्रॉपर्टी करून दिल्यानंतर ती परत मिळविता येत असेल, तर आई-वडिलांची काळजी न घेणा-या मुलांसाठी ही फार मोठी चपराक आहे. या निर्णयाचा वृद्धांना खूप फायदा होणार आहे. यामुळे आता मुले आई-वडिलांची काळजी घेतील आणि त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने वागतील, अशी अपेक्षा आता केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR