26.1 C
Latur
Friday, December 8, 2023
Homeअंतरराष्ट्रीयओलिसांना सोडवण्याच्या नेतन्याहू यांच्या पद्धतीचा जेरुसलेममध्ये निषेध

ओलिसांना सोडवण्याच्या नेतन्याहू यांच्या पद्धतीचा जेरुसलेममध्ये निषेध

जेरुसलेम : इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या ओलीसांना सोडवण्याच्या पद्धतीचा निषेध करण्यासाठी शनिवारी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. ओलिसांचे कुटुंबीयांनी या मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. या निषेधाचा शनिवार हा शेवटचा दिवस होता. यामुळे जेरुसलेमच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांचे म्हणणे आहे की, ओलिसांची सुटका करणे ही इस्रायलची सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी आणि त्यासाठी ओलिसांच्या बदल्यात हमासच्या लोकांना सोडावे लागले तरी सरकारने मागे हटू नये. ओलिसांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ते इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाबाहेर हा मोर्चा संपवणार आहेत.

तसेच मीडियारिपोर्ट्सनुसार, इस्रायलचे अनेक नागरिक पंतप्रधान नेतन्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. हे युद्ध संपल्यावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची इच्छा आहे. हमसच्या हल्ल्यापूर्वी इस्राईलमध्ये नेतन्याहू यांच्याविरोधात मोठे मोर्चे निघाले आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर हमासने २०० हून अधिक लोकांना सोबत गाझामध्ये आणले होते. हमसने त्यांना ओलीस ठेवले आहे. इस्रायलने त्या बदल्यात पॅलेस्टिनी कैद्यांच्या गटाची सुटका केली तरच ते ओलीसांना सोडतील, असे हमासचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR