मुंबई : अयोध्येत नव्यानेच उभारण्यात आलेल्या राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारीला संपन्न होत आहे. या निमित्ताने राज्य सरकारने महाराष्टÑात सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
राज्य सरकारने सुटी जाहीर करावी अशी मागणी विशेषत: भाजपच्या आमदारांनी केली होती. अखेर ही मागणी पूर्ण करण्यात आली. अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.