सोलापूर : जिल्ह्यामधील दूध उत्पादक शेतकरी दुधाचे भाव कमी झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्याच्या स्थितीला प्रति लिटर गाईच्या दुधाला २५ रुपये दर व म्हशीच्या दुधाला ३५ ते ४० रुपये दर दिला जातो. तो शेतकऱ्यांना परवडत नाही, त्यामुळे प्रतिलिटर गाईच्या दुधाला ५० रुपये व म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर शासनाने जाहीर करावा. या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
प्रतिलिटर गाईच्या दुधाला ५० रुपये व म्हशीच्या दुधाला ८० रुपये दर शासनाने जाहीर करावा. या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेने सविस्तर चर्चा करून दूध उत्पादक शेतकऱ्यांची वस्तू स्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी १५ डिसेंबर रोजी बैठक बोलवली आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी दिली. चालू वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यांच्या हक्काची अग्रीम विमा रक्कम खात्यावर जमा नाही, ती त्वरित जमा करावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान जमा करावे निवेदन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष नाना मोरे, सुरेश बापू नवले, रवींद्र मुठाळ, ज्ञानेश्वर भोसले, निहाल मुजावर, अंकुश वाघमारे, सुभाष शेंडगे, मोहोळचे युवक अध्यक्ष सचिन आवताडे इत्यादी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.