सोलापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे संसदेतील भाषण, परभणी येथील कोंबिंग ऑपरेशनमध्ये भीम सैनिकाची झालेली हत्या, बीड येथील सरपंचाचा खून व ईव्हीएम मशीन विरोधात संविधान संवर्धन समिती, सोलापूरच्या वतीने जिल्हा परिषद येथील पूनम गेटसमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करून राजीनामा घ्यावा. परभणीत कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून झाला. संबंधित पोलिसांना निलंबित करून बडतर्फ करण्यात यावे आदी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, उत्तम नवगिरे, शंकर लिंगे, रशीद सरदार, संजय गायकवाड, अशोक आगावणे, जैनू शेख, युवराज पवार, विश्वास शिंदे, विनोद इंगळे आदी उपस्थित होते.