मुंबई : हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि १० लाखांचा दंड मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी सुनावली आहे. रवि पुजारीमार्फत जया शेट्टीकडून राजन गँगने ५० कोटींची खंडणी मागितली होती.
खंडणी देण्यास नकार दिल्याने २००१ मध्ये ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी गोळ््या झाडून हत्या केली होती. त्यामुळे ही शिक्षा सुनावली. पत्रकार जे. डे. हत्याकांडानंतर ही दुसरी शिक्षा आहे.