31.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeपरभणीबस अडवून चालकास मारहाण करणा-यास शिक्षा

बस अडवून चालकास मारहाण करणा-यास शिक्षा

परभणी : बस अडवून चालकास मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. एफ. एम. खान यांनी आरोपीस एक वर्षाच्या कैदेची शिक्षा सोमवार दि. १० मार्च रोजी सुनावण्यात आली असून सदर माहिती मंगळवार दि. ११ मार्च रोजी प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

परभणी ते देऊळगाव मार्गे प्रवासी घेऊन जात असताना लिंबाजी नामदेव मोरे यांनी त्यांचे वाहन पिंगळी ते लिमला रस्त्यावर बससमोर लावले. त्यानंतर बसचालक केशव ईसापुरे यांना शिवीगाळ करून पाहून घेतो अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी देऊळगाववरून बस घेऊन परत येत असताना पुन्हा बससमोर वाहन आडवे लावून बस थांबवली. त्यानंतर काठीने मारहाण केली अशी फिर्याद बस चालक ईसापुरे यांनी दि. २ ८ ऑगस्ट २०१९ रोजी ताडकळस पोलिस ठाण्यात दिली होती.

या प्रकरणी लिंबाजी मोरे (रा. कमलापूर, ता. पूर्णा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश तावडे यांनी केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा व सत्र न्यायालयाने सात साक्षीदार तपासले. त्यानंतर आरोपी लिंबाजी नामदेव मोरे यास सोमवार दि. १० मार्च रोजी कलम ३५३ भादंवि अन्वये एक वर्षाची साधी कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ऍड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड. मयूर साळापूरकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पैरवी अंमलदार प्रमोद सूर्यवंशी, मपोशि पुष्पा जावदे, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR