35 C
Latur
Wednesday, March 26, 2025
Homeक्रीडासलामीला पंजाबच ’किंग’

सलामीला पंजाबच ’किंग’

गुजरातचा ११ धावांनी पराभव

अहमदाबाद : आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्सने विजयी सलामी दिली असून पंजाब किंग्सने २० षटकांत ५ गडी गमावून २४३ धावा केल्या आणि विजयासाठी २४४ धावांचे आव्हान दिले होते. गुजरात टायटन्सने या धावांचा पाठलाग करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्यांना २३४ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाब किंग्सने हा सामना ११ धावांनी जिंकला.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबने २० षटकांत ५ गडी गमावून २४३ धावा केल्या. पंजाबकडून श्रेयस अय्यरने नाबाद ९७ आणि शशांक सिंगने नाबाद ४४ धावा केल्या. दोघांमध्ये ८१ धावांची नाबाद भागीदारी झाली. सलामीवीर प्रियांश आर्यने ४७ धावा केल्या. गुजरातकडून साई किशोरने ३ विकेट्स घेतल्या. तर कागिसो रबाडा आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून साई सुदर्शनने ७४ धावा आणि जोस बटलरने ५४ धावा केल्या.

शेवटच्या षटकात दोन विकेट पडल्या. गुजरातच्या संघाकडून साई किशोर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने अझमतुल्लाह ओमरझाई १६ (१५), ग्लेन मॅक्सवेल ० (१) आणि स्टॉयनिस २० (१५) यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. याशिवाय राशिद खान आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. मध्यफळीतील फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यावर अखेरच्या टप्प्यात शशांकनं केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे पंजाब किंग्जच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणा-या गुजरात टायटन्सच्या संघासमोर मोठ टार्गेट सेट केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR