30.7 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeक्रीडापंजाबचा सलग दुसरा विजय

पंजाबचा सलग दुसरा विजय

लखनौला ८ गडी राखून नमवले

लखनौ : आयपीएल २०२५ स्पर्धेच्या १३ व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा ८ गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान फक्त २ गडी गमवून पूर्ण केले. या विजयासह पंजाब किंग्सला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे.

आजच्या सामन्यात पंजाब किंग्सचा वरचष्मा दिसला. पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सने दिलेले आव्हान १७ व्या षटकात पूर्ण केले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्स या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. सुरुवातीला मिळालेल्या धक्क्यामुळे धावगती मंदावली.

पॉवर प्लेमध्ये ४ गडी गमवून ३९ धावा करता आल्या. २० षटकांत ७ गडी गमवून १७१ धावा केल्या आणि विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान पंजाब किंग्सने १७ व्या षटकात पूर्ण केले. २ विकेट गमवून पंजाब किंग्सने हे आव्हान गाठले. या सामन्यात प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. तर कर्णधार श्रेयस अय्यरने विजयी षटकार मारून अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार मारून नाबाद ५२ धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR