वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेन युद्ध संपवू इच्छितात. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, वेळ अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु ते लवकरच पुतीन यांना भेट घेणार आहेत.
यापूर्वी, ट्रम्प यांनी १७ फेब्रुवारी रोजी पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. यावेळी, दोघांमध्ये युद्ध संपवण्याबाबत चर्चा झाली. दोघांनीही सुमारे दीड तास चर्चा केली. ट्रम्प म्हणाले होते की ते सौदी अरेबियात पुतिन यांना भेटू शकतात. चर्चेदरम्यान पुतिन यांनी ट्रम्प यांना मॉस्को भेटीचे आमंत्रणही दिले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की रविवारी रात्री उशिरा संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये पोहोचले. रशिया-युक्रेन युद्ध संपविण्यासाठी आणि शांतता चर्चा सुरू करण्यासाठी येथे राजनैतिक हालचाली तीव्र होत आहेत. मंटुरोव्ह यांनी युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. दोघांनीही रशिया आणि यूएईमधील धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबद्दल चर्चा केली. युक्रेन युद्ध संपवण्याबाबत दोघांमध्ये कोणत्याही चर्चेची माहिती नाही.
दुसरीकडे, झेलेन्स्कीच्या यूएई भेटीचा अजेंडा देखील उघड झालेला नाही. युएई आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शन आणि परिषद आयोजित करत आहे. येथे रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आहे.