27.1 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeमहाराष्ट्रराहुल गांधी थेट भाजी मंडईत पोहोचले, भाज्यांचे दर जाणून घेतले

राहुल गांधी थेट भाजी मंडईत पोहोचले, भाज्यांचे दर जाणून घेतले

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज थेट भाजी मंडईमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी दुकानदारांकडून लसूण, टोमॅटोसह अन्य भाज्यांचे दर जाणून घेतले. दुकानदारांनी त्यांना लसणाचा दर ४०० किलो सांगितला. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाजी मंडई भेटीचा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना राहुल गांधी यांनी लिहिले की, लसणाची किंमत पूर्वी ४० रुपये होती आणि आता ४०० रुपये झाली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले असून सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे.

राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये सांगितले आहे की, गिरी नगरसमोर हनुमान मंदिरच्या भाजी मंडईमधील हा व्हीडीओ आहे. व्हीडीओमध्ये राहुल गांधी यांना चहा पिण्यासाठी बोलावले आहे. जेणेकरून, ते येऊन महागाई किती आहे ते पाहतील. महागाईमुळे आमचे बजेट खूप खराब होत आहे. कोणाचाही पगार वाढला नसून दर वाढले असून ते कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचे राहुल गांधींना भेटणा-या महिला सांगत आहेत.

या व्हीडीओमध्ये राहुल गांधी महिलांना काय खरेदी केले असे विचारत आहेत. यावर महिला कांदा, टोमॅटो खरेदी केल्याचे सांगत आहेत. एक महिला भाजीवाल्या दुकानदाराला विचारते की, भाज्या एवढ्या का महागल्या आहेत? कशाचेही दर कमी झालेले नाहीत. काहीही घेतले तरी ३०-३५ रुपयांचे नाही, सगळेच ४०-५० रुपयांपेक्षा जास्त दराने आहे.

या व्हीडीओमध्ये भाजी विक्रेते यावेळी खूप महागाई असल्याचे सांगत आहेत. एवढी महागाई यापूर्वी कधीच नव्हती. राहुल गांधी भाजीविक्रेत्याला विचारतात लसूण किती रुपये किलो आहे? यावर भाजीविक्रेते सांगतात की, लसणाचा भाव ४०० रुपये किलो आहे.

राहुल गांधी एका महिलेला विचारतात की, तुम्हाला महागाई का वाढत आहे असे वाटते. यावर या महिलेचे म्हणणे आहे की, सरकार याकडे लक्ष देत नाही, त्यांना फक्त त्यांच्या भाषणाची काळजी आहे. सामान्य माणूस काय खाणार याची सरकारला काळजी नाही. ज्या वस्तूची किंमत पूर्वी ५०० रुपये होती ती आज १००० रुपये आहे. आता खर्च कमी करायचा असेल तर कपात करावी लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR