22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयमानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन

मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन

बंगळूरू : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या केसमध्ये बंगळूरुच्या स्पेशल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण मागच्या विधानसभा निवडणुकांमधले आहे. तेव्हा राहुल गांधींनी तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला होता. त्यानंतर राहुल गांधींवर त्यांनी खटला दाखल केला होता.

या प्रकरणी भाजपचे वकील विनोद यांनी म्हटले की, २०२३च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक जाहिरात प्रकाशित केली होती. ज्यात भाजप ट्रबलमेकर सरकार आहे असे म्हटले होते. हा खोटा आरोप होता. आरोपींपैकी दोघांना जामीन मिळाला आहे. याप्रकरणी राहुल गांधींनी स्वत: हजर होण्यापासून मुभा मागितली होती. या प्रकरणी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेसुद्धा आरोपी आहेत. परंतु कोर्टाने दोघांनीही जामीन दिलेला आहे. कर्नाटक भाजपने काँग्रेसवर आरोप करत वर्तमानपत्रांमधून खोटो आरोप केल्याचा आरोप केला होता. शिवाय राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ती जाहिरात शेअर केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR