28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयराहुल-वरूण गांधींची 'केदारनाथ धाम' येथे भेट

राहुल-वरूण गांधींची ‘केदारनाथ धाम’ येथे भेट

देहरादून : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या केदारनाथमध्ये आहेत. वरुण गांधीही केदारनाथमध्ये पोहोचले आहेत. राहुल आणि वरून गांधी दोघेही चुलत भाऊ असून केदारनाथमध्ये दोघांची भेट झाली आहे. दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. या भेटीला योगायोग असे सांगण्यात येत असून अनेक वर्षानंतर दोघे एकमेकांना भेटल्याचे बोलले जात आहे.

वरुण गांधींच्या वेळापत्रकानुसार ते मंगळवारी (७ नोव्हेंबर २०२३) केदारनाथला पोहोचले तर राहुल गांधी रविवारीच केदारनाथला पोहोचले आहेत. काँग्रेस नेते आणि तसेच केदार सभेचे अध्यक्ष राजकुमार तिवारी आणि इतर पुजारी यांनी राहुल गांधींचे स्वागत केले. यादरम्यान राहुल गांधी यांनी केदारनाथच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचीही आवर्जून भेट घेतली.

काँग्रेस नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी धार्मिक भेटीसाठी केदारनाथला आले आहेत. भगवान केदारनाथच्या संध्याकाळच्या आरतीत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, गांधी नवी दिल्लीहून देहरादून विमानतळावर पोहोचले आणि तेथून थेट हेलिकॉप्टरने केदारनाथला रवाना झाले. केदारनाथ मंदिराचे फोटो फेसबुकवर शेअर करताना गांधी म्हणाले, ‘आज मी उत्तराखंडमधील केदारनाथ धामला भेट दिली आणि दर्शन आणि पूजा केली.

तत्पूर्वी, राहुल गांधींनी त्यांच्या भेटीची छायाचित्रे शेअर केली आहेत. तसेच ते सोमवारी रात्री केदारनाथच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित होते. तिथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधींनी आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी केदारनाथला पोहोचलेल्या संत आणि भाविकांसोबत जेवण केले आणि त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी तेथील आदिगुरू शंकराचार्यांची मूर्ती पाहिली. त्यांनी सोशल मीडियावर लिहले की, मला अनेक दिवसांपासून आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेण्याची इच्छा होती, आज या सुंदर आणि पवित्र खोऱ्यांमध्ये मला ही संधी मिळाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR