मुंबई : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्र दौ-यावर आले असून त्यांनी मुंबईतील धारावी झोपडपट्टीत भेट दिली. तत्पूर्वी काँग्रेस नेत्यांनी व खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांचं मुंबई विमानतळावर स्वागत केले. धारावीमधील नवउद्योजकांशी चर्चा केल्यानंतर ते अदानी उद्योग समुहाकडून होणा-या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचाही आढावा घेणार आहेत.
त्यामुळे, राहुल गांधीचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. धारावीमधील नवउद्योजकांशी चर्चा केल्यानंतर ते अदानी उद्योग समुहाकडून होणा-या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचाही आढावा घेत आहेत. त्यामुळे, राहुल गांधीचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. राहुल गांधींनी धारावीमधील चामर स्टुडिओला भेट देत येथील उत्पादन, कलाकारी, बॅग्जची पाहणी केली. धारावीतील सुधीर राजभर भारतातील लाखो दलित तरुणांच्या जीवनाचा आणि प्रवासाचा आढावा घेतला.
राहुल गांधींनी धारावीमधील चामर स्टुडिओला भेट देत येथील उत्पादन, कलाकारी, बॅग्जची पाहणी केली. धारावीतील सुधीर राजभर भारतातील लाखो दलित तरुणांच्या जीवनाचा आणि प्रवासाचा आढावा घेतला.राजभोर यांनी धारावीच्या कारागिरांचे सुप्त कौशल्य ओळखून एक असा ब्रँड तयार केला जो जागतिक स्तरावर फॅशनच्या सर्वात प्रतिष्ठित कॉरिडॉरमध्ये ओळखला जातो. पारंपारिक कारागिरी आणि आधुनिक उद्योजकतेचा संगम म्हणजे चामर स्टुडिओचे यश आहे. कुशल कारागिरांना त्यांच्या स्वत:च्या हातांनी बनवलेल्या वस्तूंची बड्या मार्केटमध्ये विक्री होत आहे.
राहुल गांधींनी आज धारावीत सुधीर आणि त्यांच्या टीमसोबत गप्पा मारल्या, तसेच, त्यांचे काम जवळून पाहत स्वत:ही ते करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, राहुल गांधींनी शिवणकामही केले. तसेच, त्यांचे काम जवळून पाहत स्वत:ही ते करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन या धारावी भेटीची फोटो शेअर केले असून ते या फोटोत मशिनवरण शिवणकाम करत असल्याचे, बॅग्स विणत असल्याचेही दिसून येतात.