15.8 C
Latur
Friday, November 21, 2025
Homeनांदेडनांदेडात कुंटणखाण्यावर धाड

नांदेडात कुंटणखाण्यावर धाड

४ महिलांसह ५ पुरुषांना पकडले

नांदेड : प्रतिनिधी
शहरातील प्रतिष्ठित व गजबळलेल्या वजीराबाद भाजी मार्केट येथील दुस-या माळ्यावर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच बुधवारी सायंकाळी धाड टाकून ४ महिलांसह ५ पुरुषांना पोलिसांनी पकडले आहे. यात दोघे प्रतिष्ठित असल्याचे समजते.

वजीराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत भाजी मार्केट येथील इमारतीच्या दुस-या माळ्यावर कुंटणखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी ९ वाजता पोलिसांनी धाड टाकली यात मॅनेजर सहा ४ महिला व ५ पुरुष आढळून आले आहेत. सदर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वजीराबाद परिसरामध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. या भागात अनेक प्रतिष्ठित नागरिक वास्तव्यात आहेत.

कुंटणखाना मुक्तपणे अनेक दिवसांपासून सुरू होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ धाड टाकून बुधवारी रात्री. फडदा पास केला आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत वजीराबाद पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरील प्रकरणांमध्ये दोघें प्रतिष्ठित नागरिक असल्याची चर्चा शहरामध्ये सुरू होती. मात्र पोलिसांनी अद्यापही या प्रकरणी आरोपींची नावे जाहीर केले नव्हते. सायंकाळी उशिरापर्यंत ही चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक कदम यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR