22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeधाराशिवअवैध कत्तलखान्यावर धाड; ९ जिवंत जनावरांसह मांस जप्त

अवैध कत्तलखान्यावर धाड; ९ जिवंत जनावरांसह मांस जप्त

वाहनासह १८ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल ताब्यात, चार जणांवर गुन्हा दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील खिरणी मळा येथील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी शुक्रवारी (दि.३१) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. यावेळी ९ जिवंत जनावरांसह कत्तल केलेल्या अंदाजे दहा ते बारा जनांवराचे मांस जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम ४२९, ३४ महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- ५, ५ (अ), ५ (ब), ५ (क), ९, ९ (अ) सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि.३१) पहाटे ३ वा. सु. धाराशिव शहर येथील खिरणी मळा येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरे कत्तलसाठी आणुन बांधून ठेवलेले आहेत व तेथेच पत्राचे शेडचे बाजुस एका वाहनामध्ये जनावरांची कत्तल करुन विक्रीसाठी मांस भरले असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सुदर्शन कासार, सचिन खटके, पोहेकॉ. विनोद जानराव, जावेद काझी, औताडे, पोना. नितीन जाधवर, बबन जाधवर, अशोक ढागारे, वाहन चालक चापोह. अरब, पोअं भोसले, किंवडे यांच्यासह आरसीपी पथक धाराशिव शहरातील वैराग नाका येथे आले असता तेथे पोलीस ठाणे धाराशिव पोलीस उप निरीक्षक संदीप ओहोळ, पोह. घोडके, पोकॉ जमादार यांना बोलावून घेवून यांच्या मदतीने अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला.

सदर छाप्यामध्ये खिरणीमळा धाराशिव येथे राहणारे जाकेर कुरेशी, जलील गफुर कुरेशी यांनी एकुण ९ जनावरे कत्तलीसाठी बांधलेले मिळुन आले. यावर पथकाने थोडे अंतरावर मस्जीदचे समोरील पत्राचे शेडचे बाजूस एक अशोक लिलॅड कंपनीचे वाहन दिसुन आले. त्या वाहनामध्ये जनावरांची कत्तल केलेले मांस मिळून आले. वाहनामध्ये ईर्शाद सलीम पठाण (वय २९), रा. रसुलपुरा धाराशिव हा आढळून आला. त्यास सदर वाहनामधील मांस व मालकाबाबत विचारले असता त्याने सदरचे वाहन व मांस हे असलम असद कुरेशी रा. धाराशिव यांचे असलेबाबत सांगीतले. सदर ठिकाणावून व इसमाकडून एकुण ९ गोवंशीय जनावरे, मांस वजनकाटा व वाहनासह असा एकुण १८ लाख ६८ हजार रुपये किंमतीचे मांस व जनावरे जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी यांच्यामार्फत कातडीचे नमूने काढले आहेत. जीवंत गोवंशीय ९ जनावरे हे गो शाळेत देण्याची कार्यवाही सुरु होती. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR