22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमुख्य बातम्याबिहारमध्ये रेल्वेला आग; लोकांनी उडी मारून वाचवला जीव

बिहारमध्ये रेल्वेला आग; लोकांनी उडी मारून वाचवला जीव

कारिसाथ : बिहारच्या आरा येथे लोकमान्य टिळक होळी स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारून आपला जीव वाचवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रेनच्या एसी बोगीमध्ये आग लागली. बिहारमधील भोजपूर अंतर्गत दानापूर-पंडित दीनदयाल उपाध्याय रेल्वे सेक्शनच्या कारिसाथ स्टेशनजवळ ही घटना घडली. होळी स्पेशल ट्रेनला आग लागली.

ट्रेनच्या एसी बोगीला आग लागली होती. ०१४१० ही होळी स्पेशल ट्रेन दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जात होती. रात्रीच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही वेळातच ट्रेनच्या एसी बोगीला भीषण आग लागली. ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या खूपच कमी होती, त्यामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. मेन लाईनला लागलेल्या आगीमुळे अनेक ट्रेनच्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मात्र, बोगी ट्रेनपासून वेगळी करून होळी स्पेशल ट्रेन रवाना करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR