23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरलाचप्रकरणी रेल्वे अधिकारी सातपुते यास सक्तमजुरी

लाचप्रकरणी रेल्वे अधिकारी सातपुते यास सक्तमजुरी

सोलापूर/ प्रतिनिधी
लाच स्वीकारल्याप्रकरणी रेल्वे अधिकारी गणेश अण्णा सातपुते (वय ४२, रा. रेल्वे कॉलनी, कुर्डुवाडी यास सत्र न्यायाधिश रेखा पांढरे यांनी पाच वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
फिर्यादी विकास शिंदे (रा. पुणे) हे श्री राजलक्ष्मी टुर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. ते त्यासाठी रेल्वेचे तिकीट कमी गर्दी असते म्हणून येडशी येथील रेल्वे स्टेशन येथून खरेदी करत. तेंव्हा रेल्वे अधिकारी सातपुते यांनी दि.२७ एपिल २०१३ रोजी फिर्यादी विकास शिंदे यास पकडले. व त्याच्याकडून १० हजार रुपये जबरदस्तीने घेतले. शिवाय प्रत्येक तिकीटामागे १०० रुपयांची मागणी केली. अन्यथा अटक करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
तेंव्हा फिर्यादीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तेंव्हा लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी त्वरित हालचाल करुन लाचेच्या मागणीची खात्री केली. व आरोपीस २ हजाराची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. न्यायालयात जाब-जबाब नोंदवल्यानंतर आरोपीचे वकील अॅड. राहुल खंडाळ यांचा युक्तीवाद न्यायालयाने अमान्य करत आरोपीस शिक्षा ठोठावली. यात सरकारतर्फे अॅड. डी. एन. म्हस्के व आरोपीतर्फे राहूल खंडाळ यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR