28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्ररेल्वेकडून अवैध फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई; २१७३६ जणांना अटक

रेल्वेकडून अवैध फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई; २१७३६ जणांना अटक

मुंबई : मध्य रेल्वेत अवैधरित्या खाद्यपदार्थांची विक्री करणे फेरीवाल्यांना चांगलेच अंगलट आले आहे. मध्य रेल्वेकडून या अवैध फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात असून मध्य रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. २१ हजार ७४९ प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात असून तब्बल २१ हजार ७३६ फेरीवाल्यांना अटक केली. फेरीवाल्यांकडून २.७२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

एप्रिल आणि ऑक्टोबर या कालावधीत नोंदवलेल्या हॉकिंग प्रकरणांची संख्या गेल्या वर्षीच्या म्हणजेच एप्रिल आणि ऑक्टोबर या कालावधीत नोंदवण्यात आलेल्या १७,९६७ प्रकरणांच्या तुलनेत २१ टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे, यामुळे रेल्वेची कमाईही चांगली झाली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर विभागात ही कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेत विक्री करणाऱ्यांसाठी लायन्सन गरजेचे आहे. परंतु अनेक जण रेल्वे स्टेशनच्या आउटरवर रेल्वेत फेरीवाले घुसतात आणि खाद्य पदार्थांची विक्री करतात.

भुसावळ विभागात सर्वात जास्त दंड वसूल
मुंबई विभागात ८,६२४ जणांना अटक झाली. त्यांच्याकडून ९४.७७ लाख रुपये दंड वसूल. भुसावळ विभागात ६,३४९ गुन्हे दाखल. त्यांच्याकडून १ कोटी १५ लाख रुपये दंड वसूल. पुणे विभागात आरपीएफने १,८५६ गुन्हे दाखल करत १,८५५ जणांना अटक केली. एकूण १२.७१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. सोलापूर विभागात २,१८१ जणांना गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यातील २,१७८ जणांना अटक झाली आणि २१.९२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR