20.2 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रप्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र

प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र

नागपूर : प्रतिनिधी
राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन सुरू असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. याद्वारे शेतक-यांना पावसाची अचूक माहिती मिळेल, असे मुंडे म्हणाले. तसेच शेतक-यांचे श्रम कमी करण्यासाठी राज्यात ड्रोन मिशन राबवणार असल्याची घोषणाही केली. नमो किसान महासन्मान, पीकविमा, अवकाळीचे अनुदान यांसह विविध योजनांची आकडेवारी धनंजय मुंडेंनी विधानपरिषदेत मांडली.

राज्यातील १६ हजार ग्रामपंचायतींमध्ये अद्ययावत पर्जन्यमापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून, पहिल्या टप्प्यात ३ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात येतील. याद्वारे शेतक-यांना पावसाची अचूक माहिती मिळेल, पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल, असे मुंडे म्हणाले. तसेच शेतीत ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता तपासून आता शेतक-यांचे श्रम कमी व्हावेत, यादृष्टीने राज्यात ड्रोन मिशन राबविण्यात येणार आहे, असेही मुंडे म्हणाले.

राज्यात नमो किसान महासन्मान योजनेतून सुमारे ८६ लाख शेतक-यांना पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. यामधील निकषांमुळे पात्र लाभार्थी वंचित राहू नयेत, यासाठी चार महिने विशेष मोहीम राबवण्यात आली. पीक विमा योजनेतून शेतक-यांना विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया द्यावा लागला तर दुसरीकडे आतापर्यंत सुमारे ५२ लाख शेतक-यांना अग्रीम २५ टक्केप्रमाणे २२१६ कोटी रुपये रक्कम मंजूर करून त्यापैकी आतापर्यंत १७०० कोटींपेक्षा अधिक रकमेचे वितरण पूर्ण करण्यात आले. उर्वरित रक्कम वितरण सुरू आहे.

६ कंपन्याच्ंो केंद्राकडे अपिल
सहा जिल्ह्यातील विमा कंपन्यानी केंद्र सरकारकडे अपील केले असून, ती सुनावणी पूर्ण होताच या सहा जिल्ह्यांंचा विमादेखील अग्रीम प्रमाणे दिला जाईल. या वर्षी अग्रीम अंतर्गत देण्यात आलेली मदत ही मागील ५ वर्षातील रकमेच्या तुलनेत अनेक पटींनी मोठी आहे, असे मुंडे म्हणाले.

अवकाळी, गारपिटीचे अनुदान
अवकाळी आणि गारपीटीचे अनुदान नवीन घोषणेप्रमाणे वाढीव दराने मंजूर करण्यात येत असून यांतर्गत बाधित शेतक-यांना सुमारे १४५८ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरणदेखील सुरू केले आहे, असेही मुंडे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR