15.6 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeराष्ट्रीयराजभवन हे भाजपचे कार्यालय झाले : एमके स्टॅलिन

राजभवन हे भाजपचे कार्यालय झाले : एमके स्टॅलिन

चेन्नई : तामिळनाडूत राजभवनाजवळ बॉम्ब फेकण्याच्या घटनेवरून राजकारण सुरूच आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपाल आरएन रवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्रकारांशी बोलताना स्टॅलिन म्हणाले की, ‘राजभवनाबाहेर पेट्रोल बॉम्ब फेकल्याप्रकरणी पोलिसांनी तपास करून माहिती दिली आहे आणि सीसीटीव्ही फुटेजही दाखवले आहे. मात्र राजभवनातुन खोटे बोलले जात आहे. राज्यपाल स्वतः भाजप कार्यकर्त्याप्रमाणे वागत असून राजभवन हे भाजपचे कार्यालय झाले आहे. हे लाजीरवाणे आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सोमवारी मदुराई येथे स्वातंत्र्यसैनिक पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले. अलीकडेच स्टॅलिन यांनीही अप्रत्यक्षपणे राज्यपाल आरएन रवी यांच्यावर आरोप केले होते. स्टॅलिन म्हणाले होते की, उच्च पदांवर असलेले काही लोक द्रविड विचारधारा आणि त्याच्या प्रशासनाच्या मॉडेलवर प्रश्न उपस्थित करत आहेत. लोक अशा टीकेला महत्त्व देत नाहीत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी (राज्यपाल) पदावर राहावे, यामुळे द्रमुकच्या प्रचाराला बळ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी उपहासात्मकपणे सांगितले होते.

नुकतीच तामिळनाडूमध्ये राजभवनाजवळ पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधत कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये पेट्रोल बॉम्ब फेकताना दिसत आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून या मुद्द्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR