मुंबई : ‘राज ठाकरे हे एक मुक्त विद्यापीठ आहे. तिथं जाऊन कोणाही पदवी घेऊ शकतो. राज ठाकरे यांनी एक प्रस्ताव माडंला उद्धव ठाकरेंसमोर. आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, देत राहू. फक्त आमची एकच अट आहे, ज्यांनी महाराष्ट्रासंदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, त्यांच्याशी उद्या आपण एकत्र आल्यावर अनैतिक संबंध ठेऊ नये’’ असा टोला संजय राऊत यांनी दिला आहे.
तीन पक्षांच सरकार असल्याने नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. वेळ लागतोय, असे देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना महिला डॉ. सल्ला घ्यावा लागेल. अलीकडे भाजप सरकार डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला घेते, जे भारत-पाक युद्धात झाले. कारण त्यांचे जे दोन सहकारी आहेत, त्यांची नॉर्मल डिलीव्हरी कधीच झाली नाही, ते वाझंच आहेत. त्यांची डिलीव्हरी होणार नाही. भाजपला दुस-यांची पोरं खेळविण्याची सवय आहे. दुस-ंयाची पोरं पाळण्यात घेऊन माझी पोरं सांगतात. त्यापासून लांब राहिले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले.
अजित पवार हे रेम्या डोक्याचे
राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा त्यांनी शिवसेना आमचा पक्ष आहे असे म्हटले नाही’ एकप्रकारे राऊत यांनी दोघांच कौतुक केले. अजित पवार हे रेम्या डोक्याचे आहेत अशी टीका राऊत यांनी केली.