सोलापूर ( प्रतिनिधी ) विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अक्षरलेखन कला केंद्राचे संचालक अभिजित भडंगे, संस्था खजिनदार ललिता कुंभार, अभियंता प्रकाश तोरवी, सेवानिवृत्त मुख्याध्यापकद्वय विजयकुमार हुल्ले, रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी, रत्नमाला उकरंडे,प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे,माता पालक सदस्य शितल पवार, नंदिनी कुंभार आदी उपस्थित होते.
प्रारभी प्रमुख अतिथींच्या हस्ते तपोरत्नं व वीरतपस्वींच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन , रंगमंच पूजन व फित कापून स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी अहवाल वाचनातून शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडले. संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, पालकांच्या मदतीने कोणतेही कार्य सहजपणे यशस्वी होते.सर्व पालकांचे आभार मानून कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना,मैं निकला गाडी लेक,पढोगे लिखोगे, संडे, आमच्या पप्पांनी गणपती आणला, मोबाईलचे दुष्परिणाम,आई, तेलुगू चित्रपट गीत, तानाजी,झुंजू मुंजू पहाट झाली, आदिवासी गीत,मन में है शिवा,अंबे अंबे,हमाल दे धमाल, आले मराठे, गोंधळ गीत,ममयची सफर, देशभक्ती आदी विविध मराठी , हिंदी, इंग्रजी, तेलुगू गाण्यावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य व नाटक सादर करुन पालकांची मने जिंकली.
पालक टाळ्या वाजवून चिमुकल्यांना प्रेरणा देत होते.या स्नेहसंमेलनात नर्सरी ते सातवी पर्यंतच्या ३८४ विद्यार्थी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयस बिराजदार यांनी केले तर स्नेहसंमेलनाचे निवेदन सुजाता फुलारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शितल चमके, उज्ज्वला भांड, हणमंत कुरे, वैशाली गुजर ,लोमटे, शीतल पाटील, चंद्रकांत पाटील, विश्वनाथ तंबाके,रोहित हत्तरकी, रेवणसिद्ध दसले, संगीता नरगिडे,सर्व शिक्षक ,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.