21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाराजस्थान विरुध्द कोलकाता सामना रद्द

राजस्थान विरुध्द कोलकाता सामना रद्द

गुवाहाटी : राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीत पावसाने व्यत्यय आणला. पावणे नऊ वाजता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मैदानावरील कव्हर्स हटवण्यात आले होते, परंतु काहीवेळातच पुन्हा वीजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. १०.१५ वाजता कव्हर्स काढून मैदान सुकविण्याचे काम सुरू झाले. १०.२५ ला खेळपट्टीची पाहणी केली गेली. केकेआरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ७-७ षटकांचा हा सामना होणार होता आणि १०.४५ ला मॅच सुरू होणार होता, परंतु टॉसनंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मॅच रद्द केली गेली.

आरआरला क्वालिफायर १ मध्ये जागा पक्की करण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. तेच केकेआरने १९ गुणांसह क्वालिफायर १ मधील जागा पक्की केली आहे. हैदराबादने त्यांचा शेवटचा साखळी सामना जिंकून १७ गुणांसह दुस-या स्थानी झेप घेतली आहे आणि आरआरवरील दडपण वाढवले होते. पहिल्या ८ सामन्यांत ७ विजय मिळवून राजस्थानने लीगची सुरुवात दणक्यात केली होती, परंतु मागील चार सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली आणि त्यांची गाडी अडकली. १४ सामन्यांत ८ विजय मिळवून १७ गुणांसह ते तिस-य क्रमांकावर समाधान मानावे लागले. कारण सनरायझर्स हैदराबादचा नेट रन रेट हा ०.४१४ असा असल्याने ते क्वालिफायर १ साठी पात्र ठरले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR