16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवराजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीने केली ठेवीदारांची २६ लाखांची फसवणूक

राजस्थानी मल्टीस्टेट सोसायटीने केली ठेवीदारांची २६ लाखांची फसवणूक

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात बँक, पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायटीकडून ठेवीदारांची फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. उमरगा येथील राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने उमरगा शहरातील ठेवीदारांची २५ लाख ८६ हजार ९६८ रूपयांची फसवणूक केली आहे. ठेवीची मुदत संपल्यानंतरही राजस्थानी मल्टीस्टेटने ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या नाहीत. या प्रकरणी फसवणूक झालेले ठेवीदार दिलीप शंकरराव सगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाणे येथे राजस्थानी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्यामध्ये आरोपी चंदुलाल मोहनलाल, बालचंद्र लोढा, बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल, विजय विठ्ठलराव लठ्ठा, अशोक जाजु, सतिष सारडा, अजय पुजारी, नामदेव रोडे, प्रेमलता बाहेती, जगदीश बियाणी, व्यंकटेश कुलकर्र्णी (सर्व रा. परळी जि. बीड) यांचा समावेश आहे. राजस्थानी सोसायटीच्या संचालकांनी व कर्मचा-यांनी दि.१३ ऑक्टोबर २०२२ ते दि. २९ जुलै २०२४ या कालावधीत शाखा उमरगा येथे ठेवीदारांची फसवणूक केली.

ठेवीदारांना ठेवीवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवी ठेवण्यास भाग पाडले. ठेवीची मुदत संपल्यानंतर ही ठेवीदारांचे पैसे दिले नाहीत. ठेवीदीरांची २५ लाख ८६ हजार ९६८ रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ठेवीदार दिलीप शंकरराव सगर (वय ६२) यांनी दि.१९ ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे विविध कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR