मुंबई : २०२३ साली सुपरस्टार रजनीकांतचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘जेलर’ने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाद्वारे सुपरस्टार रजनीकांतने ६०० कोटींच्या क्लबमध्ये शानदार एन्ट्री केली होती. तेव्हापासून या चित्रपटाचा दुस-या भागाची चर्चा जोरदार सुरू होती. जेलरच्या निर्मात्यांनीही या चित्रपटाचा दुसरा भागाचे संकेत दिले होते.आता मिळालेल्या माहितीनुसार, सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘जेलर २’ ला होकार दिला आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांनी ‘जेलर २’ होकार दिल्यानंतर या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे शीर्षकही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपट निर्माते दोन नावांवर चर्चा करत आहेत. निर्माते ‘जेलर २’ आणि ‘हुकूम’ या दोन नावावर चर्चा करत असून, या दोन नावांमधून एक नावाची निवड करणार आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल निमार्ती कंपनी सन पिक्चर्स आणि भागधारकांशी चर्चा केली असता सर्वांनी ‘हुकूम’ हे नाव निवडल आहे. हे नाव जेलरमध्ये दाखवलेल्या रजनीकांतच्या पात्राशी संबंधित आहे. ज्याला लोक आदराने ‘हुकूम’ म्हणतात. यामुळे‘जेलर २’ या नावाने प्रदर्शित होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
जेलर २ चे शूटिंग कधी होणार सुरू ?
मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या स्क्रिप्टचा पहिला ड्राफ्ट तयार झाला आहे. ज्याला रजनीकांत आणि प्रोडक्शन कंपनीकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम जून २०२४ पासून सुरू होणार आहे. यापूर्वी रजनीकांत दिग्दर्शक लोकेश कनागराज यांच्या ‘थलैवा १७१’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहेत. यानंतर जेलर २ चे शूटिंग सुरू होणार आहे. दरम्यान, निमार्ते या चित्रपटाची अधिकृत घोषणा कधी करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.