पूर्णा : दक्षिण मध्य रेल्वे विभागातील प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन राजकोट-महेबूब नगर-राजकोट दरम्यान विशेष गाडीच्या १८ फे-या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०९५७५ राजकोट ते महेबूब नगर विशेष गाडी राजकोट येथून दर सोमवारी मार्च महिन्यात ३, १०, १७, २४ आणि ३१ तारखेला तर एप्रिल महिन्यात ७, १४, २१ आणि २८ तारखेला, मे महिन्यात ५, १२, १९ आणि २६ तारखेला, जून महिन्यात ०२, ०९, १६, २३, २९ आणि ३० तारखेला सुटेल. ही गाडी राजकोट येथून सोमवारी दुपारी १.४५ वाजता सुटेल आणि वान्कानेर ज., अहमदाबाद, वडोदरा, सुरत, जलगाव, भुसावळ, हिंगोली, पूर्णा, नांदेड, निझामाबाद, कामारेद्दी, काचीगुडा, शादनगर, जडचेरला मार्गे महेबूबनगर येथे मंगळवारी रात्री ८ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ९५७६ महेबूब नगर ते राजकोट विशेष गाडी महेबूबनगर येथून दर मंगळवारी मार्च महिन्यात ४, ११, १८ आणि २५ तारखेला, एप्रिल महिन्यात १, ८, १५, २२ आणि २९, मे महिन्यात ६, १३, २० आणि २७ तारखेला, जून महिन्यात ३, १०, १७ आणि २४ आणि जुलै महिन्यात १ तारखेला सुटेल. ही गाडी महेबूबनगर येथून दर मंगळवारी रात्री ८.१० वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच राजकोट येथे गुरुवारी सकाळी ५ वाजता पोहोचेल. या गाडीस जनरल, स्लीपर आणि वातानुकुलीत असे एकूण २२ डब्बे असणार आहेत.