22 C
Latur
Thursday, February 13, 2025
Homeमहाराष्ट्ररमजान ईददिनी बँकेची सुटी रद्द

रमजान ईददिनी बँकेची सुटी रद्द

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणा-या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुटी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला.

रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च २०२५ रोजी संपणा-या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुटी रद्द करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR