19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeपरभणीरामानंद मोदानी यांच्या अवयव दानामुळे पाच व्यक्तींना जीवन दान

रामानंद मोदानी यांच्या अवयव दानामुळे पाच व्यक्तींना जीवन दान

परभणी : सांगलीतील प्रसिध्द व्यावसायिक व मुळचे परभणी जिल्ह्यातील मानवत येथील रहिवासी असलेले रामानंद सत्यनारायण मोदानी यांच्या मेंदूत उच्च रक्तदाबामुळे रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी त्यांच्यावर मेंदूवर शस्त्रक्रिया केली परंतू वाढत्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मेंदू निकामी झाला होता.

त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रामानंद यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांचे हृदय, फुप्फुस, यकृत, डोळ व किडणी वेगवेगळ्या शहरात दि.२६ नोव्हेंबर रोजी रूग्णांना बसविण्याठी कोल्हापूर येथून विमानाने पाठवण्यात आले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पाच कुटुंबातील व्यक्तींना जीवन दान मिळाले असून मोदानी कुटुंबियांचे हे कार्य समाजातील इतरांनाही अवयव दान करण्यासाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे. रामानंद मोदानी हे सांगलीतील प्रसिद्ध व्यावसायिक व मुळचे मानवत येथील रहिवासी होते. त्यांनी नांदेडमध्ये अनेक वर्ष कार्य केले होते.

उच्च रक्तदाबामुळे मेंदूत झालेल्या रक्तस्रावामुळे त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली. पण वाढत्या गुंतागुंतीमुळे मेंदू निकामी झाला. ब्रेन डेडमुळे दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितले. यावेळी मोदानी कुटुंबियांनी मात्र त्यांचे अवयव दान करण्याची इच्छा बोलून दाखवली. मरावे परी अवयवरुपी उरावे या उक्तीप्रमाणे अवघे ४८ वयोमान असलेल्या रामानंद मोदानी यांचे हृदय, फुफ्फुसे, यकृत, डोळे व किडणी सर्व उत्तमरीत्या कार्यरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व लगेच २६ नोव्हेंबर रोजी आवश्यकता असणा-या रुग्णांना हे अवयव बसवण्यासाठी कोल्हापूर येथून विमानाने पाठवण्यात आली आहेत. यात रामानंद यांचे हृदय रिलायन्स हॉस्पिटल मुंबई, फुफ्फुसे मुंबई, लिव्हर पुणे तर किडणी व डोळे लोकल हॉस्पिटलला दान देण्यात आले आहेत. मोदानी कुटुंबियांच्या या निर्णयामुळे पाच कुटुंबातील व्यक्तींना जीवन दान मिळणार आहे.

मोदानी कुटुंबियांनी संकटाच्या प्रसंगी धाडसी पावले उचलत अवयव दानाचा घेतलेल्या निर्णयाबद्दल १५ सप्टेंबरला पुणे येथे मोदानी परिवाराचा राष्ट्रीय अवयव‌दान दिनी सन्मान होणार आहे. समस्त मोदानी परिवाराच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दु:खातही समाधान शोधणारे मोदानी कुटुंबियांचे हे पाऊल समाजातील इतरांनाही अवयव दानाचे महत्व पटवून देणारे ठरणार आहे. रामानंद मोदानी हे नांदेड येथील कर सल्लागार दिपक मोदानी यांचे भाऊ होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR