24.8 C
Latur
Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्ररामदास आठवलेंचा राज उद्धव ठाकरेंना चिमटा

रामदास आठवलेंचा राज उद्धव ठाकरेंना चिमटा

मुंबई : रिपाइं नेते रामदास आठवले हे त्यांच्या कवितांसाठी ओळखले जातात. शीघ्र कविता हे त्यांचे वैशिष्टये आहे. यमक जुळवत कवितेतून चिमटे काढणे हा त्यांचा छंद आहे. त्यांच्या कविता हा जनसामान्यांचाच नाही तर राजकारण्यांना ही आवडतात. संसदेत ही त्यांच्या कवितांना चांगली दाद मिळाल्याचे आपण पाहिले आहे.

त्यांच्या कवितांवर टीका होत असली तरी त्यांची कविता ऐकून त्याला मनमुराद दाद देणा-यांची संख्या कमी नाही. आता त्यांनी धाराशिवच्या दौ-यावर असताना राज आणि उद्धव ठाकरे यांना असा चिमटा काढला आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती अशी कविता त्यांनी केली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर रामदास आठवले यांची त्यांच्या शैलीत टीका केली.राज ठाकरे यांची फक्त सभा घेण्यापूर्वी ताकद, त्यांना मत पडत नाहीत, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट फक्त जमते. राज ठाकरेंना मत पडणार नाहीत ही कळ्या दगडावरील रेघ असल्याचा चिमटा ही आठवले यांनी काढला.

आरपीआयचा स्वबळाचा नारा
महायुती म्हणून आगामी निवडणुका लढाव्या आणि आरपीआयलाही सन्मान योजना जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली. मुंबई महानगरपालिकेत आरपीआयला १५ जागांची रामदास आठवले यांच्याकडून मागणी, योग्य वाटा मिळाला नाही तर आरपीआय स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यभरात आरपीआयची ताकद आहे. त्या ठिकाणी सन्मान जनक वाटा मिळावा अशी मागणी त्यांनी केली. धाराशिव जिल्हा दौ-यावर असलेल्या रामदास आठवले यांनी एकला चलो रे ची भूमिका जाहीर केली आहे.

मराठा आंदोलक सुद्धा भेटीला
दरम्यान मराठा आंदोलकांनी रामदास आठवले यांची भेट घेतली. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आठवले यांनी भूमिका मांडावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली. तर मुंबई मोर्चापूर्वी मराठा आरक्षणाविषयीचा तोडगा काढावा यासाठी आठवलेंनी भूमिका जाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर याप्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि त्यांना मराठा समाजाच्या मागण्यांविषयी अवगत करू असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR