32.8 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeमनोरंजनश्री रामजन्मभूमी संघर्षावर आधारित ६९५ चित्रपट १९ रोजी रिलीज होणार

श्री रामजन्मभूमी संघर्षावर आधारित ६९५ चित्रपट १९ रोजी रिलीज होणार

नवी दिल्ली : श्री रामजन्मभूमीसाठी ५०० वर्षांच्या संघर्षावर आधारित ६९५ हा चित्रपट १९ जानेवारी रोजी देशभरातील ८०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून दिल्लीत त्याचा प्रीमियर होणार आहे.

चित्रपट निर्माते श्याम चावला यांच्या मते, राम मंदिराच्या संदर्भात ६, ९ आणि ५ क्रमांकाचे मोठे योगदान आहे. ६ डिसेंबर रोजी अयोध्येत वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली आणि ९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राम मंदिराच्या बाजूने आला. आणि त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान श्री राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले.

या चित्रपटाच्या माध्यमातून इतिहासाचे अनेक पदर प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासोबतच श्री रामजन्मभूमीशी संबंधित ५०० वर्षांच्या संघर्षाची कहाणी बघण्याची संधी मिळेल.

या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश भारद्वाज आणि रजनीश बॅरी यांनी केले आहे. अरुण गोविल, मनोज जोशी, केके रैना आणि अशोक समर्थ यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. हा सिनेमा १९ जानेवारीला रिलीज होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR