28.7 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeमहाराष्ट्रराणाजगजितसिंह पाटील ‘मित्रा’च्या उपाध्यक्षपदी

राणाजगजितसिंह पाटील ‘मित्रा’च्या उपाध्यक्षपदी

मुंबई : ज्याचे आर्थिक, विकासाचे धोरण ठरवण्याचा मान तुळजापूरलाही मिळाला आहे. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील यांवी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्राच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राणाजगजितसिंह पाटील हे मंत्रिपदाचे दावेदार होते. मात्र ते मिळाले नाही. दावेदार असतानाही मंत्रिपद मिळाले नाही, तरीही नाराज न झालेल्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची आता ‘मित्रा’च्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. दिलीप वळसे पाटील, डॉ. राजेश क्षीरसागर यांचीही मित्राच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. गुरुवारी राज्य सरकारने यासंबंधीचाआदेश जारी केला आहे. केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशम’ अर्थात ‘मित्रा’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

ही संस्था राज्याची आर्थिक व धोरणात्मक दिशा ठरवते. ‘मित्रा’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे सहअध्यक्ष आहेत. कृषी, कृषी संलग्न क्षेत्र, आरोग्य व पोषण, शिक्षण, कौशल्य विकास आदी क्षेत्रांत या संस्थेमार्फत काम केले जाते.

विकासात प्रादेशिक समानता आणण्यासाठी विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्रासाठी प्रादेशिक ‘मित्रा’चीही स्थापना करण्यात येणार आहे. राज्य सरकारला आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि सीएसआर फंडाकडून विकासाच्या उपक्रमांसाठी मालमत्तेचे मुद्रीकरण आणि सवलतीचा वित्तपुरवठा आदी नाविन्यपूर्ण साधनांद्वारे अर्थसंकल्पबा संसाधने उभारण्याचा सल्ला देणे, सरकारच्या विविध विभागांना मदत करत असताना स्थानिक पातळीवरील नियोजन आणि विकासात्मक कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यासाठी जिल्ह्यांचा डेटा अ‍ॅनालिटिक्स माध्यमातून सा करणे आदी कामे केली जातात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR