24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनप्रियंकाच्या लेकीने काढली रांगोळी

प्रियंकाच्या लेकीने काढली रांगोळी

मुंबई : मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हटले जाते आणि ही म्हण प्रियंका चोप्राची मुलगी मालती मेरी हिच्यावर अगदी चपखल बसते. मालती सध्या एक वर्ष १० महिन्यांची आहे आणि जानेवारी २०२४ मध्ये ती दोन वर्षांची होईल. पण मालतीच्या प्रतिभेची झलक दिसू लागली आहे.

ती आई प्रियंकासारखी क्रिएटिव्ह आहे. १२ नोव्हेंबर रोजी सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. प्रियांकानेही दिवाळीची जोरदार तयारी केली. यावेळी लहान मालतीने सुंदर रांगोळी काढली. तिची झलक प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

प्रियंकाने दिवाळीनिमित्त तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेक मालती मेरी चोप्रा जोनासने काढलेल्या रांगोळीचा फोटो शेअर केला आहे. फुलांची रांगोळी काढण्यात आली होती. मालतीची कलात्मकता रांगोळीत स्पष्ट दिसते. आपली मुलगी मालतीचे असे टॅलेंट पाहून प्रियंकालाही आश्चर्य वाटले. तिने इन्स्टा स्टोरीवर रांगोळी शेअर करत लिहिले, ‘पहिली रांगोळी’. यासोबत हात जोडून हृदयाचा इमोजीही बनवण्यात आला आहे.

प्रियंकाने १ डिसेंबर २०१८ रोजी निकशी लग्न केले आणि जानेवारी २०२२ मध्ये ते सरोगसीद्वारे मालती मेरीचे पालक झाले. प्रियंका लग्न करून परदेशात स्थायिक झाली असली तरी ती अजूनही भारतीय संस्कृती आणि सभ्यतेशी जोडलेली आहे. प्रियंका तिच्या लॉस एंजेलिसच्या घरी प्रत्येक हिंदू सण मोठ्या थाटामाटात साजरा करते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR