21.5 C
Latur
Friday, August 29, 2025
Homeमनोरंजनअजयच्या ‘देवा श्री गणेशा’वर रणवीरचा ठेका

अजयच्या ‘देवा श्री गणेशा’वर रणवीरचा ठेका

मुंबई : रणवीर सिंह इतके दिवस ‘धुरंधर’ अवतारात दिसत होता. लांब केस, वाढलेली दाढी असा तिचा लूक होता. मात्र आता तो क्लीन शेव्ह लूकमध्ये समोर आला आहे. दीपिका आणि रणवीरने गणपतीचं दर्शन घेतले. त्यांचा व्हीडीओ काल व्हायरल झाला होता. तर आता रणवीर सिंहचा अजय गोगावलेच्या ‘देवा श्री गणेशा’ गाण्यावर फुल एनर्जीसह नाचतानाचा व्हीडीओ व्हायरल होत आहे.

एकीकडे माईकवरुन अजय गोगावले त्याचे लोकप्रिय गाणं ‘देवा श्री गणेशा’ गात आहे तर त्याच्या गाण्यावर रणवीर कमाल नाचताना दिसतोय. रणवीर सिंह किती एनर्जेटिक आहे ते तर सर्वांनाच माहित आहे. याचीच झलक पुन्हा एकदा दिसत आहे. पल्लव पलिवाल यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर व्हीडीओ शेअर करण्यात आला आहे.

रणवीरच्या या व्हीडीओवर चाहत्यांनीही अनेक कमेंट्स केल्या आहेत. रणवीरचे धमाकेदार डान्स मूव्ह्ज आणि त्याचे कौशल्य याचे सर्वांनी कौतुक केले आहे. कोणत्याही उत्सवासाठी आमंत्रित करायला रणवीर सिंह योग्य व्यक्ती आहे. त्याला आयुष्याचा आनंद घ्यायला बरोबर जमते, ‘रणवीर सिंह एकमेव व्यक्ती आहे तो ख-या अर्थाने आनंद साजरा करतो अशा कमेंट्स आल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण बॉलिवूडमधली सर्वात लाडकी जोडी.

दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या घरी एका गोंडस परीचे आगमन झाले. ‘दुआ’ असे तिचे नाव ठेवण्यात आले. लेकीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण खूप कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसली. तर दुसरीकडे रणवीर सिंह आगामी ‘धुरंधर’ सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र होता. आता नुकतेच अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सवाला रमवीर-दीपिकाने हजेरी लावली. यावेळी रणवीर फुल ऑन एनर्जीसह गणपती डान्स करताना दिसला. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR