19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्ररश्मी ठाकरेंना राजकारणात रस नाही; किशोरी पेडणेकर 

रश्मी ठाकरेंना राजकारणात रस नाही; किशोरी पेडणेकर 

नागपूर : प्रतिनिधी
महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार या प्रश्नाची नेहमीच चर्चा होत असते. याच मुद्यावरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक महत्त्वाचे विधान करत म्हणाल्या, राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनींचे नाव येता कामा नये.’

त्या नागपूरमध्ये बोलत होत्या. दरम्यान, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी माजी मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य दावेदार म्हणून घेतले. त्यावरून पेडणेकर यांनी गायकवाड यांना सुनावले.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेला नाही. त्या, त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ त्या राजकारणात आहेत असा नाही. राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाली पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनींचे नाव येता कामा नये’ असे पेडणेकर म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR