16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeनांदेडरासप उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न

रासप उमेदवाराचा आत्महत्येचा प्रयत्न

किनवट : नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभेतील रासपचे उमेदवार गोविंद जेठेवार यांनी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. किनवट येथे ही घटना घडली आहे. वैयक्तिक आर्थिक व्यवहारातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सध्या त्यांच्यावर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे ९ मतदारसंघ आहेत. यापैकी महत्वाचा मतदारसंघ म्हणजे किनवट विधानसभा मतदासंघ आहे. या मतदारसंघात किनवट विधानसभा भीमराव केराम विरुद्ध प्रदीप नाईक आणि रासपचे उमेदवार गोविंद जेठेवार यांच्यात लढत होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR