27.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देण्यात येऊ नये

रवींद्र वायकरांना खासदार म्हणून शपथ देण्यात येऊ नये

लोकसभेच्या सरचिटणिसांना नोटीस

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला. यानंतर लोकसभेत त्यांना खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहांनी लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.

दरम्यान, वायकरांच्या या विजयावर ठाकरे गटाकडून शंका उपस्थित करण्यात आली. इथे पारदर्शक आणि कायदेशीर वातावरणात मतमोजणी झालेली नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नये अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढलेले हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शहांनी लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांना नोटीस पाठवली आहे. पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, भारतात पहिल्यांदा ईव्हीएम मशिन मतमोजणीबाबत एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे रवींद्र वायकरांनी कलम ९९ नुसार त्यांना खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल, असे यामध्ये म्हटले आहे.

नोटीसपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की, अशी मागणी यापूर्वी कोणी केली नसेल. तरीही आपण शपथ देण्यामागे संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन सकारात्मक कृती म्हणून रवींद्र वायकर यांना खासदारकीची शपथ देऊ नये, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. उमेदवाराचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन घेऊन हजर असतो तो फोन ईव्हीएम मशिनसोबत जोडलेला होता, असा आरोप झाल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि तपास/चौकशी सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR