सोलापूर : जिल्हयातील शेतकर्यांच्या विविध मागण्यांबाबत रयत क्रांती संघटनेने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. महायुती सरकारने झालेल्या निवडणूकीत शेतकर्यांना दिलेले आश्वासन पुर्ण करण्यात यावे कारण जिल्हयातील शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त झाला.
त्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही म्हणून राज्य सरकारने शेतकर्यांचे संपूर्ण शेतीचे पिक कर्ज माफ करण्यात यावे. शेतकर्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास विद्युत पुरवठा करण्यात यावा. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना कारखानदाराकडे थकलेले ऊस बिल १५ टक्के व्याजासहित जमा करावे.
सोयाबिन ला प्रती क्विंटल ६००० रूपये व कांद्याला प्रती क्विंटल ४००० दर द्यावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.यावेळी कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील, युवा अध्यक्ष अमोल वेदपाठक,पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष हणमंत गिरी,जिल्हाध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा सरचिटणीस रमेश भांगे ,शहराध्यक्ष महेश कोरे आदी उपस्थित होते.