कोलकाता : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणा-या कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले आहे. २००८ च्या पहिल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं बंगळुरुच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करत विजयी सलामी दिली होती. १८ वर्षांनी हा हिशोब चुकता करत १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजयी सलामी दिली आहे.
कोलकाता नाईट रायÞडर्सचा कर्णधार आजिंक्य रहाणे याने ३१ चेंडूत केलेल्या ५६ धावा, २६ चेंडूत केलेल्या ४४ धावा आणि अंगकृष्ण रघुवंशी याने २२ चेंडूत केलेल्या २२ चेंडूतील ३० धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाताच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ८ बाद १७४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून सलामीला आलेल्या फिल सॉल्ट आणि विराट कोहलीच्या भात्यातून अर्धशक आले.